पुणे – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखांचा ‘खेळ’ अखेर थांबला असून आठवडाभराच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा. असे थेट आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महाालिकांच्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
यातच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या या मुद्यावरून आता रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर ट्विट करत घणाघात केला आहे. आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली दाखवण्याची वेळ आली. असं म्हणत खोत यांनी ठाकरे सरकारवर झरी टीका केली आहे.
सदाभाऊ खोत यांचे ट्विट
”महानगरपालिका व जि.प. निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा – सुप्रिम कोर्ट…आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली दाखवण्याची वेळ आली.”
महानगरपालिका व जि.प. निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा – सुप्रिम कोर्ट
आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली दाखवण्याची वेळ आली.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) May 5, 2022