#Prokabaddi2019 : जयपुर पिंक पॅंथर्सची गुजरातवर मात

अहमदाबाद – प्रो कबड्डी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात जयपुर पिंक पॅंथर्सच्या संघाने गुजरात फाॅर्च्यून जायंट्‌सच्या संघाचा 22 विरुद्ध 19 गुणांनी रोमहर्षक पराभव करत आगेकूच केली.

यावेळी जयपुरच्या दिपक हूडाने 7 तर विशाल आणि संदिप धुलने प्रत्येकी 3 गुण करत संघाच्या विजयात मोलाचा वाता उचलला. यावेळी या तिघांव्यतिरिक्‍त पवन टी.आर, निलेश साळुंखे, नितीन रावल आणि अमित हूडा यांनी प्रत्येकी 2 गुण केले. तसेच यावेळी गुजरातच्या संघातर्फे पंकजने 6 तर सचिन आणि रोहित यांनी प्रत्येकी 3 गुण केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)