मुंबई – मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. अलिकडेच सारा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. सारा सर्वात लोकप्रिय स्टार किड्समध्ये गणली जाते. साराचा फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंट बॉलिवूडच्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. साराच्या प्रत्येक फोटोचा सोशल मीडियावर बोलबाला दिसून येतो. त्यामुळे सचिनची ही लेक ग्लॅमरस स्टाईलने बॉलिवूडच्या आयकॉन्सना टक्कर देत आहे.
साराने तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना प्रभावित केल्यानंतर ती आता अभिनय क्षेत्रात काम करून चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. तिला अभिनयात खूप रस आहे आणि तिने अभिनयाचे धडेही घेतले आहेत. साराच्या बॉलिवूड डेब्यूची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे. साराला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
जर सारा तेंडुलकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तर ती तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देऊ शकते. साराचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. ती भारतीय ते पाश्चात्य सर्व पोशाख कॅरी करते. साराचा फॅशन सेन्स नेहमीच हटके असल्याचे दिसून आले आहे.