मुंबई – महाराष्ट्रात आता पर्यंत भाजप पक्षाच्या जाहिरातीत ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ हे वाक्य वाचायला ऐकायला मिळत होते. मात्र आता शिवसेनेकडून जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असे छापून आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजकीय नेत्यांनी यावरून भाजप पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.
दया (sorry देवा), कुछ तो गडबड है…….🤔🤔🤔🤔🤔 pic.twitter.com/tIGfNyNANs
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 13, 2023
जाहिरातीवरून कलगीतुरा रंगलेला असताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत खोचक ट्वीट केलं आहे. ट्विटमध्ये जाहिरातीच्या बॅनरवर सीआयडीचं या सिरिअलचे एक मीम लावले आहे. यात सीआयडी मालिकेतील कलाकार शिवाजी साटम यांचा त्यांच्या सहकलाकारांसमवेत फोटो आहे. त्यावर ‘दया कुछ तो गडबड है’ हा प्रसिद्ध डायलॉगदेखील आहे. असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
दरम्यान,’राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या जाहिराती मुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमध्ये सुरुवातील ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ लिहिले असून त्याखाली अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे असे लिहिण्यात आले आहे. या जाहिरातीमध्ये मतदान सर्वेक्षणाची टक्केवारी देण्यात आली आहे.
दरम्यान यावर भाजप नेते अतुल भातळकर यांनी प्रतिकिया दिली असून ते म्हणाले,’आमचे सरकार पुन्हा बहुमताने निवडून येणार असल्याचे या सर्व्हे मधून समोर आले आहेत. मात्र देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी जाहिरात आम्ही कधीच दिली नव्हती.
तर जाहिरातमध्ये देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवणार असल्याचे जाहीर केले असल्याचे भातळकर म्हणाले.