Hrithik Roshan Supported To Saba Azad: अभिनेता हृतिक रोशनची लेडी लव्ह आणि अभिनेत्री सबा आझाद अलीकडेच पॅरिस फॅशन वीकमध्ये तिच्या डान्समुळे चर्चेत होती. तिचा रॅम्पवरून डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटिझन्सने सबाला खूप ट्रोल केले आणि तिला थेरपी घेण्याचा सल्लाही दिला. यानंतर सबा आझादनेही ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. आता तिचा बॉयफ्रेंड हृतिक रोशनही तिचा स्पोर्ट केला आहे.
हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सबा आझादचा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने एक अतिशय सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. ‘ती सरेंडर करते, म्हणूनच ती चमकते.’ व्हिडिओमध्ये सबा आझादने मॅचिंग जॅकेट आणि पँटसोबत सोनेरी रंगाचा क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे. यादरम्यान सबा हातात माइक घेऊन बेफिकीरपणे नाचताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सबा आझादला रॅम्पवर तिच्याच तालात नाचताना पाहून लोकांनी तिला ट्रोल केले होते. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले – ‘काय झाले, मी आवाज न करता पाहत होतो आणि मला वाटले तिला काही प्रॉब्लेम आहे.’
तिच्या व्हिडिओवर लोकांच्या अनेक नकारात्मक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सबाही गप्प बसली नाही. जेव्हा एका सोशल मीडिया यूजरने ‘तुला थेरपीची गरज आहे’ असे सांगितले. यावर सबाने त्या व्यक्तीला खडसावले. मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना सबाने लिहिले, ‘का, होय सर/मॅडम भांडण!! मी सहमत आहे आणि मी ते नियमितपणे घेते कारण आपल्यासारख्या द्वेषाने भरलेल्या जगात प्रत्येकाने ते वापरून पहावे !!असं म्हणत तिने ट्रोलिंग करणाऱ्याला युजर्सला सुनावले होते.