मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी 13’ चा शनिवारी महाअंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाच्या पर्वामध्ये डिनो जेम्स (Dino James) याने बाजी मारली असून तो ‘खतरों के खिलाडी 13 ‘ चा विजेता ठरला आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरशीची लढत झाली होती. त्यात दमदार कामगिरी करत ‘खतरों के खिलाडी 13’ च्या विजेतेपदावर डिनो जेम्सने आपले नाव कोरले.
अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा, मराठमोळा शिव ठाकरे, डीनो जेम्स, रश्मीत कौर हे टॉप 5 स्पर्धक होते. यात डिनो जेम्स यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला असून त्याला 20 लाख रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे. सोबतच ट्रॉफी आणि मारुती स्विफ्ट ही कार सुद्धा त्याला बक्षिसाचं स्वरुप देण्यात आली आहे. तर अरिजीत तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा यांनी टॉप 3 पर्यंत मजल मारू शकले. तर मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा टॉप 5 पर्यंत पोहोचला.
View this post on Instagram
दरम्यान, यंदाच्या ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये अंजुम फकीह, साउंडस मौफकीर, अर्जिता तनेजा, अर्चना गौतम, शिव ठाकरे, डेजी शाह, शीझान खान रश्मीत कौर, डिनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, निर्रा एम बॅनर्जी, रोहित बोस रॉय, रूही चतुर्वेदी, आणि अंजली आनंद हे स्पर्धक सहभागी झाले होते. या शोला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. ‘खतरों के खिलाडी 13’मधले अनेक स्पर्धक त्यांच्या कृत्यांमुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत राहिले होते.