मॉस्को – रशियातील एका प्रसिद्ध मिलिटरी ब्लॉगलचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. हा बॉम्बस्फोट घडवल्या प्रकरणी रशियातील पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या ब्लॉगरने आपल्या ब्लाॅगमधून रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे नेहमीच जोरदार समर्थन केले होते. त्या रागातून युक्रेननेच हा बॉम्बस्फोट घडवून आणला असल्याचा दावा रशियाने केला आहे.
व्लादलेन तातारस्की असे या बॉम्बस्फोटात ठार झालेल्या 40 वर्षाय ब्लॉगरचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्गमधील नेवा नदीच्या काठावरील एका कॅफेमध्ये चर्चा करत असताना झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला.
या स्फोटात किमान 30 लोक जखमी झाले. त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. स्फोट होण्याच्या काही वेळ आगोदर तातारस्की यांना एक भेट दिली गेली होती. त्यातच हा बॉम्ब होता, असा संशय व्यक्त केला जातो आहे.
धक्कादायक! ‘No Ball’ चा निर्णय अंपायरच्या जीवावर बेतला; भर मैदानात संतापलेल्या खेळाडूने…
याप्रकरणी अधिकाऱ्यांनी दरया ट्रायोपोवा नावाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ट्रायोपोवा ही 26 वर्षीय युवती असून तिने यापूर्वी रशियातील युद्धविरोधी मोर्चामथ्ये भाग घेतला होता. त्याबद्दल तिला अटकदेखील झाली होती. तिला अटक झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. तर ती फरार असून तिच्या आई आणि बहिणीला समन्स पाठवले गेले असल्याचे एका अन्य वृत्तसंस्थेने म्हटले आहे.