जगभरातील सोन्यापैकी 23 टक्के सोने एकट्या ‘या’ देशाकडे

मॉस्को – गेल्या वर्षभराच्या काळात करोनामुळे अनेक मोठमोठ्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या. मात्र, रशिया यात काहीसा वेगळा ठरल्याचं दिसतंय. त्याचे कारण म्हणजे पहिल्यांदाच2020 मध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रशियाकडील सोन्याचा साठा विक्रमी स्तरावर वाढला आहे.

सध्या रशियाकडे जवळपास 583 बिलियन डॉलर किमतीचा सोन्याचा साठा आहे. अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन मागील अनेक वर्षांपासून अमेरिकेवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी मोहिम राबवत होते. याच मोहिमेला आत्ता यश येत असल्याचे आता बोलले जात आहे.

रशियाच्या सेंट्रल बॅंकेने नुकतीच आकडेवारी जाहीर केली. यानुसार जून 2020 पर्यंत रशियाकडील सोन्याचा साठा 23 टक्‍क्‍यांपर्यंत वाढलेला होता. जून 2020 पर्यंत रशियाकडे 128.5 बिलियन डॉलर किमतीचा सोन्याचा साठा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता रशियाकडे जगातील एकूण सोन्याचा जवळपास 22.9 टक्के भाग आहे.

मॉस्को टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार मागील 3 वर्षांमध्ये रशियाने आपल्या परदेशी चलनाच्या भंडारात डॉलरच्या जागेवर सोने आणि इतर चलनांना जागा दिलीय. यात चीनच्या युआन या चलनाचाही समावेश आहे. यामागे रशियाचं अमेरिकेवरील अवलंबत्व कमी करणं हा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.