मेष : कामाचा ताणतणाव कमी झाल्याने पुन्हा नव्या जोमाने उभे राहाला. व्यवसायात नवीन कामे मिळतील. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. पैशाची ऊब मन प्रसन्न बनवेल. सकारात्मक दृष्टिकोन लाभ घडवून आणेल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाची कामे तुमचेवर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलत देतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. बेकार व्यक्तींना आशादायक संधी दृष्टीक्षेपात येईल.
वृषभ : केलेल्या कष्टाचे फळं मिळेल. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचा बेत आखाल. हातातील कामे वेळेवर पूर्ण करण्याकडे भर राहील. कामामुळे धावपळ दगदग होईल. पैशाची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत नेहमीचे काम करून इतरांना कामात मदत कराल. वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. घरात केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. स्वत:चीच मते इतरांच्या माथी पाडाल. सुवार्ता कळेल.
मिथुन : जिद्द व चिकाटी या जोरावर कामात प्रगती साधाल. प्रगतीस पूरक ग्रहमान. व्यवसायात मनातील बेत कृतीत आणण्याचा विचार असेल. योग्य व्यक्तींची मिळालेली संगत लाभदायी ठरेल. नोकरीत कामानिमित्ताने वरिष्ठ एखादी सुविधा देतील. जोडधंद्याचा फायदा होईल. प्रवासाचे योग. घरात आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. शुभकार्ये ठरतील. सामूहिक क्षेत्रात मान मिळेल.
कर्क : आशा निराशेचा खेळ चालू राहील. तरी सकारात्मक धोरण ठेवा. व्यवसायात थोडी सबुरी धरलीत तर केलेल्या कष्टाचे चीज होईल. गोंधळात टाकणारी स्थिती असेल तर वरिष्ठांचा सल्ला घ्या. पैशाच्या व्यवहारात चोख रहा. नोकरीत सतर्क राहा. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनाविरुद्ध वागावे लागले तरी मतप्रदर्शन करू नका. घरात संबंध सलोख्याचे ठेवा. दुसऱ्यांच्या मतांचा आदर करा. प्रकृतीची हेळसांड करू नका.
सिंह : प्रयत्नाला नशिबाची साथ मिळाली तर सर्व गोष्टी वेळेत पूर्ण होतील. मनोबल चांगले असेल. व्यवसायात तुम्हाला मनाला पटेल, रुजेल तसेच धोरण ठेवा व त्याप्रमाणे कृती करा. महत्त्वाचा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. आर्थिक घडी सुधारण्यासाठी योग्य पावले उचलाल. नोकरीत एखादी चांगली संधी चालून येईल. लाभ घ्या वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा.
कन्या : कामात लवचिकता ठेवलीत तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ आता मिळेल. नवीन कामे मिळतील. पैशाची वसुली होईल. नोकरीत सहकाऱ्यांच्या मदतीने कामाचा भार हलका करून मनाविरुद्ध वागावे लागले तरी तडजोडीचे धोरण ठेवा. बेकार व्यक्तींना कामाची नवीन संधी चालून येईल. घरात इतर व्यक्ति “आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना?’ याची खबरदारी घ्या. कामात चोख राहा.
तुळ : रेंगाळलेली कामे मार्गी लागल्याने कामाचा हुरुप वाढेल. वेळेचे व स्वखर्चाचे नियोजन केलेत तर सर्व काही साध्य होईल. व्यवसायात ओळखीतून नवीन सहकारी मिळतील. कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमचेवर राहील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. सर्व सतर्क राहून कामे उरका. घरात अनावश्यक खर्च टाळा. घरातील लोकांच्या समाधानासाठी प्रयत्न कराल.
वृश्चिक : आजचे काम आजच करा. कुणावरही विसंबून राहू नका. व्यवसायात स्थिती समाधानकारक राहील. कामाच्या नवीन योजना मनात घोळतील त्या प्रत्यक्षात साकार करण्यापूर्वी त्यातील त्रुटींचा अभ्यास करा. नोकरीत कामाचा आळस येईल. परंतु हलगर्जीपणा करू नका. कामाचे वेळी काम इतर वेळी आराम कराल. घरात तरुणांचे विवाह जमतील. नवीन बातमी आनंद देईल. कार्यक्रमानिमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील.
धनु : मनाला पटेल तेच काम हाती घेऊन मार्गी लावाल. व्यवसायात कामानिमित्ताने महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट व चर्चा कराल. खेळत्या भांडवलाची सोयही होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत मनाप्रमाणे काम कराल. काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता परंतु सलोख्याचे संबंध ठेवा. कामानिमित्ताने प्रवास घडेल. घरात खरेदीचे बेत पार पडतील. सजगवृत्तीने वागून कामांना गती द्याल. गैरसमजुतीने होणारे वादविवाद टाळा. विद्यार्थ्यांनी शंका निरसन करून मगच अभ्यासाला लागा.
मकर : कामाचा ताण कमी झाल्याने मनावरचा ताणही कमी होईल. व्यवसायात कामाची योग्य दिशा ठरवाल व त्याप्रमाणे पावले उचलाल. दैनंदिन व्यवहारांना गती येईल. कामाचा व्याप वाढवण्याचा विचार असेल. नोकरीत मानाचे पद भूषवाल. कामात झालेला बदल सुखावह ठरेल. जोडधंद्यातून फायदा मिळेल. घरात बोलण्यामुळे रागलोभाचे प्रसंग येतील. अतिस्पष्टवक्तेपणा टाळा. मुलांच्या प्रगती व प्रकृतीची चिंता कमी होईल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवा.
कुंभ : विचारांना कृतीची जोड दिलीत तर यशाचे प्रमाण वाढेल. कामाचा उरक राहील. व्यवसायात कामांना गती येईल. आर्थिक प्रश्न सुटतील. हितचिंतक मदत करतील. मनातील सुप्त बेत प्रत्यक्षात साकार होण्यास मूर्त स्वरूप येईल. नोकरीत फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. सहकारी व वरिष्ठांची मदत कामात होईल. घरात तुमच्या कामाचे सर्वजण गोडवे गातील. केलेल्या कष्टाचे चीज मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला हुरुप येईल.
मीन : पैशांच्या व्यवहारांना उत्तम संधी मिळेल. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या. व्यवसायात उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे पावले उचला. कमी श्रमात जास्त यश मिळवा. चार पैसे राखून ठेवा. नोकरीत वरिष्ठ तुमच्याकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवतील. रागावर नियंत्रण ठेवा. हट्टी स्वभावाला आळा घाला. घरात नाचता येईना.. अशी अवस्था असेल. सर्वांच्या मागण्या पुरवताना तारांबळ उडेल. कौटुंबिक कारणाने नातेवाईक एकत्र येतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावेल.