बारामतीत कोरोनाचा रुद्रावतार; दिवसभरात ‘इतक्या’ जणांना बाधा

बारामती ( प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात कोरोनाने रुद्रावतार धारण केला असून आज दिवसभरात हाती आलेल्या अहवालानुसार ४७ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. गोविंद बाग येथील चार रुग्णांच्या संपर्कातील त्यांच्या कुटुंबातील २० जणांना क्वारनटाईंनआले आहे.

बारामती शहर व तालुक्यातील रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे दोन दिवस प्रतीक्षेत असलेले अहवाल हाती आल्यानंतर ४७ जण कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. सरकारी तसेच खाजगी प्रयोगशाळेत एकूण २१४ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ४७ जणांना बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले.

बारामतीत एकूण रुग्णांची संख्या ५२० इतकी झाली आहे. तर २५५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. नागरिकांनी कोरोनाला घाबरू नका परंतु काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये.तसेच ६० वर्षावरील व्यक्ती व कोमोर्बीड व्यक्ती यांनी घराबाहेर पडू नये. घरांमध्ये सुद्धा अलगीकरणामध्ये राहावे . इतरांनी देखील कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरावा, सॅनीटायजरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग पाळावे आसे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.