“आरटीई’ प्रवेशाची लॉटरी तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर

पुणे जिल्ह्यातील 985 शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी

 

पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्‍के राखीव प्रवेशाची ऑनलाइन लॉटरी काढण्यात तांत्रिक अडचण येत आहे. यामुळे लॉटरीची प्रक्रिया एक-दोन दिवस लांबणीवर पडणार आहे.

“आरटीई’ अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. 2021-22 या वर्षातील प्रवेशांसाठी राज्यातील 9 हजार 432 शाळांनी नोंदणी केली होती. त्यात 96 हजार 684 प्रवेशाच्या जागा दर्शवल्या होत्या. यासाठी तब्बल 2 लाख 23 हजार 61 पालकांकडून आपल्या मुलांचे ऑनलाइन अर्ज नोंदवले. अर्ज नोंदविण्यासाठी 3 ते 30 मार्च अशी मुदत होती.

पुणे जिल्ह्यातील 985 शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यात 14 हजार 773 प्रवेशाच्या जागा दाखवल्या आहेत. त्यासाठी 55 हजार 833 अर्ज आले आहेत.

आता प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्याची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने सुरू केली. 6 एप्रिल रोजी लॉटरी काढण्याचे नियोजन कहोते. मात्र, त्यात तांत्रिक अडचणी येत आहे. त्या दूर झाल्यानंतर लॉटरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.