पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रतिक्षा यादीतील केवळ 12 हजार 871 बालकांचेच शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले.
राज्यात 9 हजार 331 शाळांनी “आरटीई’ प्रवेशासाठी नोंदणी केली होती. यात 1 लाख 15 हजार 477 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या. त्यासाठी 2 लाख 91 हजार 368 ऑनलाइन अर्ज आले.
नियमित प्रवेशाबरोबरच यंदा प्रतिक्षा यादीही जाहीर झाली. यातून 25 हजार 261 बालकांची निवड झाली. प्रवेशाचे “एसएमएस’ मिळाल्यानंतर 9 हजार 575 बालकांचे तात्पुरते प्रवेश झाले. काही पालक प्रवेशासाठी गेलेच नाहीत. 622 बालकांचे प्रवेश काहीना काही कारणांनी रद्द झाले.
जिल्ह्यातील शाळांसाठी प्रतिक्षा यादीतील 4 हजार 818 बालकांची निवड झाली. त्यातील केवळ 2 हजार 647 च प्रवेश झाले.