मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडीनंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेनंतर महिला नेत्या चित्रा वाघ देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर हल्ला करत खोचक प्रश्न विचारला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला.
Home Minister of Maharshtra @AnilDeshmukhNCP Finally Resigns !
Now the question arises that who will be the New Vasooli Minister??
Change of face won’t change the Corrupt intentions of the MVA Government.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra#AnilDesmukh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 5, 2021
चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.