नवी दिल्ली – ऑस्कर पुरस्काराकडे कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्या देखील हातात असावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. भारतासाठी यंदाचा हा सोहळा खूप खास ठरला आहे.
याच कारण म्हणजे ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच, यावेळी गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांनी ऑस्करच्या मंचावर ‘नाटू नाटू’ गाणं जबरदस्त परफॉर्मन्स देखील केलं.
‘Naatu Naatu’ from ‘RRR’ wins the Oscar for Best Original Song! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/tLDCh6zwmn
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
आता पर्यंत ‘नाटू नाटू’ गाणं अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गाजलं. या गाण्यात अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची जबदस्त केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहता आली. तर दुसरीकडे ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्टफिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे.