रॉयल एनफिल्ड म्हंटलं कि लगेच एक दमदार बाईक डोळ्यासमोर येते या कंपनीच्या वेगवेगळ्या बाईक मॉडेल्सने तरुणाईपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनाच अक्षरशः वेड लावलेलं आहे.आता पुन्हा एकदा रॉयल एनफिल्ड कंपनी भारतीय बाजारपेठेत एक नवीन बाईक आणणार आहे, तिचे नाव ‘शॉटगन’ असेल, हि बाईक कंपनीचे चौथे मॉडेल असणार आहे.
अशी असू शकते ‘शॉटगन’ बाईक-
जी ६५० cc इंजिन सेगमेंटमध्ये येईल. सध्या कंपनीकडे या सेगमेंटमध्ये इंटरसेप्ट ६५०,कॉंनटिनेंटल जीटी ६५० आणि सुपर मेटिअर ६५० हे मॉडेल्स आहेत. नवीन रॉयल एनफिल्ड बाईक चे टेस्टिंग मॉडेल नुकतेच पाहण्यात आले आहे. त्यात टिअर ड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी दिली जाऊ शकते.
याशिवाय, मोटरसायकल सीट, रुंद हँडलबार, राऊंड एलईडी हेडलॅम्प,ड्युअल पुशशूटर एक्सझोट आणि राऊंड रौन्ग एलईडी टेललॅम्पसह येईल. या नवीन बाईकमध्ये सेमी डिजिटल इन्स्टुमेंट क्लस्टर येऊ शकते. याला आकर्षक लूक देण्यासाठी अलॉय व्हील्सचा वापर करण्यात येणार आहे. त्याचवेळी,एकदा बाईक लाँच झाल्यानंतर,कंपनी त्याचे सहायक भाग देखील बनवणार आहे. तसेच सुरक्षेसाठी,या बाईकला दोन्ही चाकांसाठी डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनेल एबीएस मिळणार आहे.