IPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा सामना सुरु आहे. केकेआरने प्रथम फलंदाजी केली असून आरसीबीला २०० धावांचे लक्ष्य दिले आहे. केकेआरच्या जेसन रॉयने स्फोटक खेळी खेळली आहे. जेसन रॉय व एन जगदीशन यांनी पॉवर प्लेमध्ये ६६ धावा काढल्या. आजचा सामना बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे.
जेसनने सहाव्या षटकात शाहबाज अहमदला चार खणखणीत षटकार खेचले असून जेसनने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आहे. वैशाख विजय कुमारच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात जगदीशन ( २७ ) झेलबाद झाला आणि केकेआरला ८३ धावांवर पहिला धक्का बसला. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वैशाखने जेसनचा बोल्ड उडवला.
जेसन २९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावांवर बाद झाला.जेसनने केकेआरला भक्कम पाय उभा करून दिला. वैशाखच्या तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने केकेआरचा कर्णधार नितीश राणाचा सोपा झेल सोडत नितीशला जीवदान देणे आरसीबीला महागात पडले आहे. त्याने १६व्या षटकात २ उत्तुंग षटकार खेचले अन् संघाची धावसंख्या १५० पर्यंत नेली.
वैशाखच्या चौथ्या षटकात नितीशने १७ धावांचा पाऊस पाडला. नितीश २१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावांवर नितीशची वनिंदूने आरसीबीला मोठी विकेट मिळवून दिली.त्याच षटकात दुसरा सेट फलंदाज वेंकटेश अय्यर ( ३१) बाद झाला. वनिंदूने २४ धावांत २ विकेट्स घेतल्या.