बेंगळूरू – आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी रॉयल चॅलेंजर बेंगळूरू संघाने भारताचे माजी कसोटीपटू व माजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आता कोहलीच्या संघाला नवा प्रशिक्षक मिळाल्यानेयंदाच्या मोसमात तरी बेंगळूरू संघाची कामगिरी सरस होणार का हेच पाहणे महत्वाचे ठरणारआहे.
यंदाच्या स्पर्धेसाठी येत्या गुरूवारी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. गेल्यावेळी स्पर्धा करोनामुळे अमिरातीत झाली होती. पण यावेळी भारतात होणार आहे. एप्रिलपासून होणाऱ्या या स्पर्धेसाठी आठ संघांनी तयारी सुरू केली आहे. बांगर 2014 साली भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते. त्यांची मुदत गेल्या वर्षी संपली. त्यानंतर विक्रम राठोड यांनी त्यांची जागी घेतली.
बांगर यांनी भारतीय संघाकडून 2001 ते 2004 या काळात 12 कसोटी आणि 15 वनडे खेळल्या आहेत. याआधी कोहली सोबत काम करणारे बांगर आता पुन्हा त्याच्या सोबत काम करतील. गेल्यावेळी भारतीय संघासाठी तर यावेळी आयपीएलमध्ये आरसीबीसाठी काम करणार आहेत.
गेल्या काही वर्षापासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळूरू संघाला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. विराटचा संघ अंतिम फेरीत पोहोचला पण विजेतेपदाने हुलकावणी दिली. आता या वर्षी विराट आणि बेंगळूरूला यश मिळेल का याची सर्वांना उत्सुकता आहे.