Row over secular and socialist – संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, नव्या संसद भवनामध्ये प्रवेश करण्यात आला. याच दिवशी (१९ सप्टेंबर) काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांच्या आरोपांनी सर्वांचे लक्ष वेधले. नव्या संसद भवनात प्रवेश करताना वाटण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतींमधून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द वगळण्यात आल्याचा आरोप चौधरी यांनी केले.
या आरोपांवर स्पष्टीकरण देताना कायदे मंत्री, अर्जुन राम मेघवाल यांनी, लोकसभा सदस्यांना देण्यात आलेल्या संविधानाच्या प्रति या मूळ प्रति असल्याने त्यात घटनादुरुस्तीत केलेले बदल नसल्याचे सांगितले.
तत्पूर्वी, १८ सप्टेंबरला, लोकसभा सचिवालयाच्या निवेदनात, हस्ताक्षरातील संविधानाच्या मूळ प्रति लोकसभा सदस्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द संविधानात होते का? । Row over secular and socialist
संविधान सभेने २२ जानेवारी १९४७ ला संविधानाची प्रस्तावना स्वीकारली. संविधानाच्या प्रस्तावनेतून संविधानाची ओळख, त्यातील तत्वज्ञान, तत्व आणि ध्येय यांची ओळख करून देण्यात आली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी, देशामध्ये आणीबाणी लागू केली असताना १९७६ मध्ये ४४ वी घटनादुरुस्ती केली. याद्वारे संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.
इंदिरा गांधींची भूमिका । Row over secular and socialist
इंदिरा गांधी यांनी, संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. यासोबतच त्याकाळातील सोव्हिएत रशिया व चीन यांच्यापेक्षा आपला समाजवाद वेगळा असल्याचेही त्यांनी सांगितले.
संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द १९७६मध्ये घालण्यात आला. असे असले तरी संविधानाचे मूळ तत्वज्ञान हे सुरुवातीपासून धर्मनिरपेक्षच होते. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शब्द समाविष्ट करणे ही केवळ एक औपचारिकता ठरली.
समाजवादी शब्दावरून राजकारण । Row over secular and socialist
संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवादी शब्दावरून अनेकदा राजकारण होताना दिसतं. २०२० मध्ये भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी राज्यसभेत ठराव मांडत, संविधानातून समाजवादी शब्द काढून टाकण्याची मागणी केली होती.
२००८ मध्ये, सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे समाजवादी शब्द संविधातून काढून टाकावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर टिपणी करताना सर्वोच्च न्यायालयाने, ‘तुम्ही समाजवादी शब्दाकडे डाव्यांच्या व्याख्येप्रमाणे का पाहता? समाजवादी या शब्दाकडे खुल्या दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा अर्थ नागरिकांच्या कल्याणासाठी योजना असा होतो.’ असे सांगितले होते.