शिर्डी – कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीच्या सहा जणांवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना शिर्डी परिसरात सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. यात पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. वर्षा सुरेश निकम (पत्नी, वय 24), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय 25), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजी सासू, वय 70) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय 55), संगिता चांगदेव गायकवाड (सासू, वय 45), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी संशयित सुरेश निकम याला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शिर्डी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी सतत माहेरी जायची. आपल्या संसासारत सासूरवाडीच्या मंडळीचा हस्तक्षेप वाढत आहे. या संशायावरून व रागातून जावयाने हे कृत्य केल्याची सांगण्यात आले आहे. जो दिसेल त्याच्यावर तो चाकून वार करीत होता. यामध्ये सहा जण जखमी झाले. तर वर्षा निकम, रोहित गायकवाड आणि हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. आरोपीचा संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा डाव असल्याचं त्याच्या कृतीतून दिसून येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीजवळ सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली. जखमीवर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.
सावळीविहीर येथील वर्षा गायकवाड हिचा विवाह संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम याच्याशी झाला होता. काही काळाने दोघांमध्ये कायम किरकोळ कारणामुळे वाद होत होते. वाद झाला की वर्षा ही माहेरी निघुन जायची. त्यामुळे, आपल्या संसारात सासू-सासरे, मेव्हणी, मेव्हणा यांचा हस्तक्षेप वाढत चालल्याचा त्याला राग होता. वर्षाने संगमनेर पोलीस ठाण्यात पतीविरूद्ध तक्रारही दिली होती. त्यानंतर ती सावळीविहीर येथे निघुन गेली होती.
आरोपी सुरेश निकम याने फोन करुन बोलावणे केले होते. मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बुधवारी (20 सप्टेंबर) आरोपीने रोशन निकम याला घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास सावळीविहिर गाठली.दार वाजवल्यावर कुटुंबीयांनी दार उघडले. तेव्हा निकम याने लगेच दिसेल त्याच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. पत्नी वर्षा पुढे आली तर तिच्यावरही त्याने हल्ला केला. निकम याने एकापाठोपाठ एक सहा जणांवर वार केले. यात पत्नी वर्षा निकम, मेव्हणा रोहित गायकवाड आणि आजीसासु हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. मेव्हणी योगिता गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व सासू सांगिता गायकवाड हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी निघून गेले.
ही घटना पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांना समजली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीसही रवाना झाले. गुरूवारी पहाटे पोलीस पथके संगमनेर येथे दाखल झाली. आरोपींच्या घरी जाऊन माहिती घेतली मात्र ते घरी नव्हते. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन मुख्य आरोपी संतोष निकम व रोशन निमक यांना नाशिक येथून अटक केली.