-->

रोहित पवारांचे भाजप नेते निलेश राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई – राजधानी दिल्ली पाठोपाठ आता राज्यातील शेतकरी देखील केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यास कमी पडत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते. आता त्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना नकलीपणा करत असल्याचे म्हलटे होते. त्यावर आमदार रोहित पवार यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले.

निलेश यांनी म्हटले होते की, ‘नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत.’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.


निलेश राणे यांच्या टीकेला उत्तर देताना रोहित म्हणाले की, बातमीची शहानिशा न करता मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज आहे. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील, असं म्हणत निलेश राणेंना टोला लगावला आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.