वाढत्या महागाईमुळे सीरियाने छापली चक्क ‘एवढ्या’ हजार पाउंडची नवी ‘नोट’

दमिश्‍क – गगनाला वाढलेली महागाई आणि देशाची खालावलेली अर्थव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर सीरियाने रविवारी पाच हजार पाउंडची नवी नोट जारी केली आहे. या चलानाला सीरियाई लीराही म्हटले जाते.

Syria floats new bank note amid soaring inflation

आता सीरियाच्या चलनात ही सगळ्यांत मोठी नोट असणार आहे. बाजाराच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही नोट जारी करण्यात आली असल्याचे त्या देशाच्या केंद्रीय बॅंकेने म्हटले आहे.

सीरियात गेले दशकभर अंतर्गत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे चलन लीरा हे दिवसेंदिवस दुबळे होत चालले आहे. दशकभरापूर्वी एक डॉलर 47 लीरा मूल्याचा होता. आता लीरा कमकुवत झाल्यावर 1 डॉलरचे मूल्य 1250 लीरा झाले आहे. खुल्या बाजारात तर ते 2500 पर्यंत गेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.