जामखेड: संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांचा धक्कादायक परभाव झाला असुन शदर पवार यांचे नातु रोहित पवार यांनी तब्बल 1 लाख 35 हजार 824 मते घेऊन राम शिंदे यांचा 43 हजार 347 मतांनी धक्कादायक पराभव केला आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती गेल्या 25 वर्षाच्या भाजपाच्या बालेकिल्लेला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे रोहित यांच्या रुपानं पवार घराण्यातील तिसरी पिढी पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहे. विजयाकडे घौडदौड करत असतानाच काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करत लाडु. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या २५ वर्षाच्या भाजपाच्या बालेकिल्लेला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे रोहित यांच्या रुपानं पवार घराण्यातील तिसरी पिढी पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहे. विजयाकडे घौडदौड करत असतानाच काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करत लाडु. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. आज कर्जत येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या शासकीय गोठवूनमध्ये मतमोजणी करण्यात आली यावेळी यावेळी 353 मतदान केंद्र, 14 टेबल व 26 फेऱ्या व्दारे मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून रोहित पवार यांनी शेवट पर्यंत आघाडी घेतली होती दरम्यान सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी मतमोजणी केंद्रात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जस जशी मतमोजणी सुरू झाली गेली तस तसे रोहीत पवार यांचे मताधिक्या वाढतच गेले. पंधरावी फेरी सुरू झाली तरी रोहीत पवार मतांची अघाडी घेतच होते. अखेर रोहित पवार यांचे मताधिक्य वाढत असल्याचे पाहुन राम शिंदे यांनी मागच्या गेटने बाहेर पडत मतमोजणी ठीकाणाहुन काढता पाय घेतला व गाडीच बसुन निघुन गेले. दरम्यान रोहित पवार यांनी तहसील कार्यालयाच्या मिडिया सेल मध्ये तब्बल एक ते दीड तास बसून राज्याचा निवडणूकीचा आढावा घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातु रोहित पवार व पालकमंत्री राम शिंदे यांच्या लढतीमुळे कर्जत जामखेड मतदार संघाने राज्याचे लक्ष वेधले होते. पालकमंत्री राम शिंदे यांनी विकासासाठी काम करत मंत्री पदाच्या काळात कोट्यावधी निधी आणला मात्र जवळच्या कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभारामुळे जनतेच्या मनात राम शिंदे यांच्याबाबत द्वेष निर्माण झाला होता. राम शिंदे यांनी जनतेच्या भावनांची कदर केली नाही. जवळच्या कार्यकर्त्यांना महत्त्व दिले.अशी जनतेची कायम ओरड राहीली तरी देखील राम शिंदे यांनी दुर्लक्ष केले.यामुळे जनतेच्या मनातला रोष ओळखून राष्ट्रवादीचे यूवा नेते रोहीत पवार यांनी जामखेड कर्जत मध्ये प्रवेश केला. जनतेची पाण्याची गरज पुर्ण करत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले व जनतेच्या मनात कमी कालावधीत जागा मिळवली. राम शिंदे यांनी जंगजंग पछाडले मात्र रोहित पवार यांच्या भावनिक आवाहनाला व केलेल्या सामाजिक कामाला जनतेने प्रतिसाद दिला.यावेळी कर्जत शहरातुन क्रेनव्दारे रोहित पवार यांना फुलांचा हार घालण्यात आला दरम्यान काल पासुनच मतदारसंघात रोहित पवार अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते काल पासुनच मतदार संघात रोहित पवार निवडुन आले असल्याची चर्चा सुरू झाली होती पालकमंत्री राम शिंदे यांना जवळच्याच कार्यकर्त्यांकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला असल्याची चर्चा कर्जत शहरात होती.
उमेदवारांन पपडलेले मते
आप्पासाहेब पालवे – 345 (मनसे) शंकर भैलुमे.586 (बसपा) राम शिंदे. 92 हजार 477 (भाजप) रोहित पवार. 1 लाख 35 हजार 844 (राष्ट्रवादी) अरूण जाधव. 3 हजार 849 (वंचित) अपक्ष उमेदवार – सोमनाथ शिंदे. 391 गोविंद अंबेडकर. 205 अॅड सुमित पाटील.792 बजरंग सरडे.214 अॅड महारूद्र नागरगोजे.386 राम शिंदे. 2070 ज्ञानदेव सुपेकर 305 नोटा – 867