IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्माचा पत्ता कट करत कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली. या निर्णयामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आता बीसीसीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, हार्दिक पांड्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. हार्दिक पांड्याला ICC वर्ल्ड कप 2023 दरम्यान दुखापत झाली होती. तो अजूनही त्या दुखापतीतून सावरलेला नाही.
दुखापतीमुळे हार्दिक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेचा भाग होऊ शकला नाही किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा आणि T20 मालिकेचा भाग होऊ शकला नाही. आता पंड्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही पुनरागमन करणे कठीण जात आहे.
एवढेच नाही तर बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, पांड्याची दुखापत अजूनही गंभीर आहे, त्यामुळे तो संपूर्ण आयपीएल स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसू शकतो. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया आणि मीम्सचा पाऊस पडला. रोहितचे चाहते ही बातमी ऐकून आनंद व्यक्त करत आहे.
KARMA AND SHARMA ALWAYS BACK.
HARDIK PANDYA RULED OUT OF IPL 2024…
🚨🔥ALMOST CONFIRM NEWS 🔥🚨#HardikPandya pic.twitter.com/r6Te6X4N9K— MuktaRo45 (@MuktaPuroh99271) December 23, 2023
मुंबई इंडियन्सने नुकत्याच झालेल्या लिलावापूर्वी गुजरात टायटन्ससोबत व्यापार करून हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील केले होते. यानंतर त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स हा आयपीएलचे पहिले 5 हंगाम जिंकणारा संघ बनला. 2020 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने शेवटचे विजेतेपद पटकावले होते. हार्दिकला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले.
Scenes right now.#HardikPandya #MumbaiIndians pic.twitter.com/26lRHsxKBd
— Rajabets 🇮🇳👑 (@smileagainraja) December 23, 2023
Hardik Pandya : I’m doubtful for IPL 2024 due to injury
Nita Ambani : pic.twitter.com/97fRKZ3tQj
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) December 23, 2023
दरम्यान, हार्दिक पांड्या आयपीएलच्या सामन्यात खेळू न शकणार असल्याच्या बातम्या समोर येताच चाहते सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘शर्मा आणि कर्म नेहमी स्ट्राइक करतात.’ दरम्यान, आणखी एका यूजरने लिहिले की, ‘रोहित शर्मासोबत कधीही पंगा घेऊ नका.’ हार्दिक पांड्या कर्णधार झाल्यामुळे रोहित शर्माचे चाहते खूश नाहीत हे उघड आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मीम्सवरून ते स्पष्ट होत आहे.