कोरेगाव – कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यात असलेल्या हिवरे गावात विक्रम विजय खताळ (वय १३) या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला व त्याचा मृतदेह उसाच्या फडात टाकण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला असून रात्री उशिरा उघडकीस आला आहे. खुनाच्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली असून वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, हिवरे गावात तणावपूर्ण वातावरण आहे.