काबूल – काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आज एक रॉकेट हल्ला झाला. अमेरिकेच्या सैन्याच्या देखरेखीखाली विदेशी नेगरिकांना सुरक्षितपणे देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच हा रॉकेट हल्ला झाला, असे अफगाण पोलीस प्रमुख रशिद यांनी सांगितले.
रविवारी दुपारीच हा रॉकेट हल्ला झाला. या रॉकेट हल्ल्यामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला. आतापर्यत कोणत्याही गटांने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही, असे ते म्हणाले.
काबूल विमानतळाजवळील अतिशय गजबजलेल्या रहिवासी भागात या रॉकेटचा स्फोट झाला. गुलाई बागातील 11 व्या शतकातील खाजेह बघरा या पुरातन ठिकाणाजवळ या स्फोटाचा आवाज ऐकू आला होता. या भागातील रहिवासी इसारतीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेच्या सैन्याच्या देखरेखीखाली सुरू असलेली माघारीची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात सुरू आहे. अजूनही विमानतळाच्या परिसरामध्ये हजारो नागरिक सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वीच इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्या किमान 20 जण ठार झाले. त्यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचाही समावेश होता.