पुणे – दत्तवाडी हद्दीमध्ये एका २१ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. मयत व्यक्तीचे नाव अमित सरवदे (रा.जनता वसाहत) आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, अमित सरवदे याच्यावर दोन अज्ञात मारेकर्यांनी शाहू वसाहत येथे कोयत्याने वार करत गोळीबार केला आहे. त्यामध्ये अमित सरवदेचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मारेकऱ्यांची मोटरसायकल मिळाली आहे.