मोशी, खेडमधील टोल नाक्यावर शांतता
चिंबळी/ पाटस/ खेड- शिवापूर – चीनमधून जगभरात फैलावलेल्या करोनामुळे संपूर्ण राज्यावर विळखा घातला आहे. याला जिल्ह्यातील महामार्गही अपवाद ठरले नाहीत. पुणे- पिंपरी चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाजारपेठा थंडावल्या आहेत.
शासकीय यंत्रणा कामाला लागली असताना आता सुप्त परिणाम इतर व्यवसायावर दिसून येत आहेत. जिल्ह्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर महामार्ग, सातारा महार्गावरील वाहतूक कमालीची मंदावली आहे. त्यामुळे महामार्गावर चोवीस तास गतीमान असलेली वाहनांची चाके रोडावली आहे.
त्यामुळे करोनाची बाधा वाहतुकीवर अर्थात महामार्गाला झाली आहे. पुणे शहरातून बाहेर पडणाऱ्या महामार्गावर शनिवारी (दि.14) 70 टक्के वाहतूक थंडावल्यामुळे टोलनाक्यावर शुकशकाट जाणवत होता.