मुंबई – रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही मदतनिधी सामन्यांची क्रिकेट मालिका येत्या रविवारपासून येथे सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला. यावेळी सचिनचे जुने दिवस व त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. सचिनने फलंदाजीचा सराव करताना आक्रमक फटकेबाजी केली व त्याचवेळी जगप्रसिद्ध असलेला सचिन… सचिन… हा गजर पुन्हा एकदा घुमला.
येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या रोड सेफ्टी मदतनिधी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. सचिन या स्पर्धेतील सामन्यांमध्ये खेळणार आहे. सचिनसह ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखे अनेक आजी माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू या
स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांचा खेळ पाहण्याची पर्वणी पुन्हा एकदा चाहत्यांना मिळणार आहे.
इंडियन मास्टर राइड या संघाचा सचिन कर्णधार आहे. सचिनच्या संघातच सेहवाग, युवराज सिंग, अजित आगरकर आदी प्रसिद्ध खेळाडू आहेत. 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सचिनने गेल्या 7 वर्षांत अनेक मदतनिधी सामन्यांत सहभाग घेतला आहे. ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यात होरपळलेल्यांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बुशफायर लीगमध्येही सचिनने खेळ केला होता.