पिंपरी – अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली. याबाबत मुलीच्या भावाने रोडरोमिओला जाब विचारला. या कारणावरून संतापलेल्या रोडरोमिओने भावालाच मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या मुलीच्या आईलादेखील मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी अडीचच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या 41 वर्षीय आईने शनिवारी (दि. 28) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.