गोपाळगंजमध्ये आरजेडी नेत्यावर गोळीबार

गोपाळगंज : आरजेडी नेते मुन्ना श्रीवास्तव यांच्यावर रविवारी पहाटेच्या वेळी अज्ञात वयक्तीने गोळ्या झाडल्या. गोपाळगंज जिल्ह्यातील ठावे पोलिस स्टेशनच्या रेल्वे स्थानकाजवळ पहाटेच्या वेळी हि घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना गोरखपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताचपोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

आरजेडी नेते विदेशी टोला या गावाचे रहिवाशी आहेत. या घटनेसंदर्भात वृत्त असे की, मुन्ना श्रीवास्तव हे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. थावे रेल्वे स्थानकाकडे जात असताना दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी त्याना लागली आहे.

स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. लवकरच दरोडेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल असे एसपी मनोजकुमार तिवारी यांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरॅची तपासणी पोलिसांतर्फे केली केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.