वृत्तसंस्था – चित्रपटाच्या सेटकर अभिनेत्याकडून चुकून गोळीबार झाला असून या गोळीबारात सेटवर सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला आहे. तर दिग्दर्शक जखमी झाला आहे. ही घटना न्यू मेक्सिकोमधील बोनान्स क्रिक रेंच सेटवर घडली. हॉलिवूड चित्रपट ‘रस्ट’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हॉलिवूड अभिनेता एलेक बाल्डविन असे गोळीबार करणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे याच बंदुकीचा वापर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये केला जात होता.
‘रस्ट’च्या सेटवर ऍक्शन सीन शूट करण्यासाठी काही बंदुकींचा वापर देखील केला जात होता.अशातच अभिनेता बाल्डविनकडून एका प्रॉप गनमधून ही गोळी सुटली होती. या गोळीबारात चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्स या या ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.तर ४८ वर्षीय दिग्दर्शक जोएल सुजा जखमी झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यात आला नाही. पुढिल तपास पोलिस करत आहेत.