दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदी मार्क बाउचरची यांची निवड

केपटाउन : माजी कसोटीपटू, यष्टीरक्षक मार्क बाउचर यांची दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. ही निवड २०२३ पर्यत असणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेचे संचालक ग्रॅहम स्मिथ यांनी ही घोषणा केली आहे.

मार्क बाउचर याच्यांसह दक्षिण आफ्रिकेच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी एनोच एनक्वे यांची निवड करण्यात आली आहे. त्याची निवडसुध्दा २०२३ पर्यत असणार आहे.

दरम्यान, ४३ वर्षीय बाउचरने आफ्रिकेकडून १४६ कसोटी, २९० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने व २५ टी-२० सामने खेळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.