मुंबई – अभिनेता सुशांत सिंग प्रकरणात आज पुन्हा रिया चक्रवर्तीची सीबीआय चौकशी करण्यात आली. सीबीआयने आज पुन्हा रिया चक्रवर्ती आणि इतर तिघा संशयितांना चौकशीसाठी बोलाविले होते. सीबीआयच्या चौकशीचा 12 वा दिवस आहे. तर रियाच्या चौकशीचा आजचा चौथा दिवस आहे.
रिया प्रमाणेच आज या प्रकरणातील इतर संशयित शौविक चक्रवर्ती, श्रुती मोदी आणि सॅम्युल मिरांडा यांची चौकशी करण्यात आली. सीबीआय सुरुवातीला या प्रकरणातील साक्षीदार यांच्याकडे चौकशी करत होती. मात्र, आता थेट संशयितांची चौकशी करत आहेत.
या प्रकरणात आणखी दोन संशयित आहेत. ते म्हणजे रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि आई. त्यांना अजून सीबीआयने चौकशीसाठी बोलावले नाही.