मुंबई – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अडचणीत आलेल्या रिया चक्रवतीला बॉलीवूडमध्ये काम शोधणे दिवसेंदिवस अवघड होते आहे. त्यामुळे तिने आता दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने दक्षिणात्य निर्माते-दिग्दर्शकांशी चर्चा करायलाही सुरुवात केली आहे.
सध्या ती हैदराबादमध्ये आहे आणि तिथेच राहून काम शोधते आहे. बॉलिवूडमध्ये आगामी “चेहरे’मध्ये तिचा छोटा रोल आहे. पण सिनेमाच्या पोस्टरवर तिला स्थान देण्यात आलेले नाही. आता दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम मागण्यासाठी रिया चक्रवर्तीला थोडी आणखी तडजोड करावी लागणार आहे.
दक्षिणात्य सिने निर्मात्यांनी तिला तिचे मानधन कमी करण्याची सूचना केली आहे. सिनेवर्ल्डमध्ये टिकून रहायचे असेल, तर रियाला त्यांची ही अट मान्यच करावी लागणार आहे. त्याशिवाय ती आपले ग्लॅमर पुन्हा मिळवू शकणार नाही. त्यासाठी तिने ज्या तेलगू इंडस्ट्रीतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती, तेथेच पुन्हा आधार मागण्यासाठी जावे लागते आहे.