बहुचर्चित ‘कॅप्टन अमेरिका’चा पार्ट 4 लवकरच

हॉलीवूडमधील प्रसिद्ध “कॅप्टन अमेरिका’ सिरीजचा चौथा भाग लवकरच येणार आहे. “द फाल्कन ऍन्ड द विंटर सोल्जर्स’ या सिरीजचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे कॅप्टन अमेरिका या सुपरहिरोला घेऊन चौथा सिक्‍वेल लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिक्‍वेल ख्रिस इवान्स हे छोटासा रोल करणार असाच प्रेक्षकांना अंदाज असेल. 

यासारख्या अन्य अपेक्षाही या सिक्‍वेलबरोबर जोडल्या गेल्या आहेत. डिज्नी प्लस आणि “मार्वलस फाल्कन ऍन्ड विंटर सोल्जर्स’ चे लेखक आणि शो क्रिएटर टीमने या चौथ्या भागाच्या कथेचे लेखन करत आहेत. दिग्दर्शक स्पेलमन आणि दलन मूसन मिळून्न या कथेचे लेखन करणार आहेत. 

या चौथ्या भागात डॉक्‍टर स्ट्रेंज आणि मल्टिवर्स ऑफ मॅडनेस हे देखील दिसण्याची शक्‍यता आहे. या सिरीजमधील “मार्वल एन्ड गेम’ या तिसऱ्या सिनेमाच्या अखेरीस ख्रिस इवान्स अगदी म्हातारा झालेला दिसला होता. 

मात्र फ्लॅशबॅकमध्ये जाऊन तो अगदी जवान, तरणाबांड हिरो म्हणून दिसावा अशी अनेक फॅन्सची अपेक्षा आहे. याबाबत हॉलिवूडमधील फॅन्टॅसीप्रेमींची अपेक्षा पूर्ण होणार की नाही याची अधिकृत घोषणा करोनाचा लॉकडाऊन संपल्यावर होईल, तेंव्हाच समजेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.