मुंबई – हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता ‘रितेश देशमुख’ सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतो. रितेश आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ शेअर करतो.
दरम्यान, पुन्हा एकदा रितेशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘हिंदू-मुस्लिम’ ऐक्याचा संदेश देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला ‘हिंदू-मुस्लिम…भाई-भाई’ असा हॅश टॅग त्याने दिला आहे.
रितेशने या व्हिडिओला आपला चित्रपट ‘बंगिस्तान’चं ‘अल्लाह हू… हे राम’ हे गाणं दिलं आहे. सध्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक तसेच कमेंन्ट्स दिल्या आहेत.
View this post on Instagram
Life is too short to have boring hair. #Baaghi3 #promotions styled by @karishmagulati