मुंबई : इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स ‘आयफा’ 2023 ला अनेक बॉलीवूड कलाकरांनी हजेरी लावली होती. यंदाच्या आयफा सोहळ्यात आलिया भट्टला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘गंगूबाई काठीयावाडी’साठी मिळाला. तसेच प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या मराठी चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि अभिषेक बच्चन यांनी केले होते.
यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्याचा आयफा पुरस्कार हृतिक रोशनला ‘विक्रम वेधा’ या चित्रपटासाठी मिळाला. अनिल कपूर यांनाही ‘जुग जुग जियो’साठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांना तांत्रिक विभागातही पुरस्कार मिळाले आहेत. आर. माधवनने ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
- विजेत्यांची यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट- दृश्यम 2
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आर. माधवन (रॉकेट्री : द नंबी इफेक्ट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – हृतिक रोशन (विक्रम वेधा)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (केसरियाँ, ब्रह्मास्त्र)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- श्रेया घोषाल (रसिया, ब्रह्मास्त्र)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका – अनिल कपूर (जुग जुग जियो)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका – मौनी रॉय (ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा)
- प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी – रितेश देशमुख (वेड)
- चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी- कमल हासन