Abhishek Bachchan On Politics – लोकसभेची यंदाची निवडणूक अनेक अर्थाने चर्चेची ठरली आहे. त्यातच आता या चर्चेसाठी आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंदी चित्रपटातील प्रख्यात अभिनेता अभिषेक बच्चन सुध्दा या निवडणुकीतून राजकारणात डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. । Lok Sabha Election 2024
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अभिषेक यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून उमेदवारी देउ शकतात. समाजवादी पक्ष, स्वत: अखिलेश यादव अथवा बच्चन कुटुंबापैकी कोणाकडूनही या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र अभिषेक यांच्या नावावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अभिषेक यांना उमेदवारी देऊन मध्य प्रदेशात इंडिया आघाडीसाठी अनुकूल असे वातावरण तयार करण्याचा अखिलेश यांचा विचार आहे. भारतीय जनता पार्टीचे व्ही. डी. शर्मा हे येथून उमेदवार आहेत व सध्या त्यांना कोणतेही प्रबळ आव्हान नसल्यामुळे शर्मा यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. आघाडीच्या जागावाटपात कॉंग्रेसने खजुराहोची जागा समाजवादी पक्षासाठी सोडली आहे.
बच्चन कुटुंबाचे नाते
बच्चन यांच्या कुटुंबाचे मध्य प्रदेशशी नाते आहे. अभिषेक बच्चन यांच्या मातोश्री जया बच्चन यांचा जन्म भोपाळचा आहे. येथेच त्यांचे बालपण गेले आहे व त्या राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. आता जया बच्चन यांच्या या नात्याचा लाभ घेण्याचा अखिलेश यांचा प्रयत्न आहे.
तसेच अभिषेक यांच्या उमेदवारीमुळे राज्याच्या निवडणुकीत ग्लॅमर निर्माण होईल अशी समाजवादी पक्षाची चर्चा होईल असा त्यांचा होरा आहे. आता अभिषेक खरेच राजकारणात डेब्यू करतात का याचे उत्तर मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल.
दरम्यान, अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ‘ब्रीद’, ‘धूम 4’, ‘हाऊसफुल 5’, ‘दसवीं’ अशा दर्जेदार सुपरहिट सिनेमांत अभिषेक बच्चनने काम केलं आहे. लवकरच त्याचे आणखी काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
“मी कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही” – अभिषेक बच्चन । Abhishek Bachchan On Politics । Lok Sabha Election 2024
अभिषेकने 2013 साली एका मुलाखतीत राजकारणातील प्रवेशाबद्दल भाष्य केलं होतं. तो म्हणालेला, “माझे आई-बाबा राजकारणात आहे. पण राजकारणात एन्ट्री करण्याची आता तरी माझी इच्छा नाही.
मी पडद्यावर राजकीय नेत्याची भूमिका साकारू शकतो पण खऱ्या आयुष्यात नाही. मी कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही”. असं तो म्हणाला होता. । Abhishek Bachchan