बॉलीवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. करिनाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट केले आहेत. शाहरुख खानपासून ते आमिर खानपर्यंत करिनाने बड्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. मात्र, करिअरच्या सुरुवातीच्या काळात करीना कपूरने अशी एक चूक केली, ज्याचा तिला आजही पश्चाताप होत असेल. हा किस्सा आहे ‘ऐतराज’ या चित्रपट साइनचा, चित्रपट साइन करताना करिनाच्या एका चुकीमुळे प्रियांका चोप्रा सुपरस्टार झाली.
दरम्यान, 2004 साली करीना, प्रियांका आणि अक्षय कुमारचा ऐतराज हा चित्रपट आला होता. या चित्रपटासाठी प्रियांकाच्या आधी करीना कपूरला साइन करण्यात आले होते. ‘ऐतराज’चे निर्माते सुभाष घई आणि दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी करीनाला दोन्ही भूमिकांची ऑफर दिली होती. चित्रपट निर्मात्यांनी करिनाला सांगितले होते की, या चित्रपटात दोन महिला आणि एक पुरुष मुख्य भूमिका असेल. अशात करीना स्वतःसाठी कोणतीही स्त्री भूमिका निवडू शकते.
करिनाने या चित्रपटात एका महिलेची भूमिका निवडली जी पुरुष मुख्य अभिनेत्याच्या विरुद्ध होती. चित्रपट निर्मात्यांनी करीनाला पूर्ण संधी दिली, परंतु तिने दुसरी भूमिका सोडली, जी अधिक ताकदवान होती. नंतर या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राची निवड झाली.
हीच चूक करीना कपूरने केली आणि त्याचा फायदा प्रियांका चोप्राने घेतला. या चित्रपटात प्रियांका चोप्राला केवळ समीक्षकांची प्रशंसाच मिळाली नाही तर तिला लोकांकडून खूप प्रशंसाही मिळाली. या चित्रपटात जरी करिनाने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली असली, तरी प्रियांका चोप्राने चित्रपटाची सगळी लाइमलाइट चोरली.
करीना आणि प्रियांकाने ‘ऐतराज’ चित्रपटात एकत्र काम केले असेल, पण या चित्रपटानंतर दोघांनीही एकत्र काम केले नाही. मात्र, शाहरुख खान आणि फरहर अख्तर यांच्यामुळे करिनाने ‘डॉन’ चित्रपटातील ‘ये मेरा दिल’ हे आयटम साँग केले. करीना आणि प्रियांका यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. दोघे नेहमी एकमेकांपासून अंतर ठेवतात.