सैराट या सुपरहिट चित्रपटातून आपल्या अभिनयाने अभिनेत्री रिंकू राजगुरूने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. रिंकू राजगुरू सोशल मीडियावरही खूपच ऍक्टिव्ह असते.
View this post on Instagram
ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. रिंकू राजगुरूने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनयाप्रमाणेच रिंकू तिच्या लुककडेही विशेष लक्ष देत असते.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये रिंकूने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि राखाडी रंगाची फॉर्मल पॅन्ट परिधान केली असल्याचे दिसत आहे. या लुकमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
रिंकूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती “आइए मेहरबान’ या गाण्यावर छत्री घेऊन नृत्य करत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
या फोटोंवर असंख्य कमेट्स आणि लाइक्स मिळत आहेत. दरम्यान, सध्या करोना संसर्गामुळे सर्वच चित्रपटांचे शूटिंग बंद असल्याने कलाकार आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.
View this post on Instagram