वाघोली(पुणे) -करोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी व ग्रामस्थांच्या सोयीसाठी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत निधीतून ऍम्ब्युलन्सची खरेदी करण्यात आली आहे.
रविवारी (दि. 30) ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच मालती गोगावले, माजी उपसरपंच मारुती गाडे, समीर भाडळे, सुधीर भाडळे, जयप्रकाश सातव पाटील, शिवदास उबाळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. करोना व पुढील काळामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी ग्रामपंचायतीची ऍम्ब्युलन्स उपलब्ध असणार असून ग्रामस्थांना त्याचा फायदा घेता येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भाडळे यांनी सांगितले.