Amravati Lok Sabha Election 2024| आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अमरावती लोकसभा मतरदार संघासाठी भाजपकडून नवनीत राणा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेले बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे.
बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांची उमेदवारी जाहीर केली. तर काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून आमदार बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू ? Amravati Lok Sabha Election 2024|
प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. “१७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली. २ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची. १७ रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका,” असे आवाहन बच्चू कडू यांनी लोकांना केले. याशिवाय नवनीत राणा यांचा दोन लाखाने पराभव करू, वेळ आली तर त्यांचं डिपॉझिट जप्त करू असा इशारा प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी दिला आहे.
नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर Amravati Lok Sabha Election 2024|
बच्चू कडू यांची अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांना उमेदवारी न देण्याची पहिल्यापासून मागणी होती. पण भाजपने नवनीत राणांना संधी दिल्याने महायुतीत असलेले बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय शिवसेनेचे आनंदराव अडसूळ देखील नवनीत राणांना उमेदवारी दिल्याने नाराज आहेत.
बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर केली. दिनेश बूब हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते. त्यांनी आता बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा:
वीजेच्या दरात वाढ! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या नवे दर