सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतसिंहच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतची फसवणूक केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. तेव्हापासून रिया चक्रवर्ती माध्यमांच्यासमोर आलेली नाही. पण,रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात रियाकडून खंडणीचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी आज पहिल्यादांच रियाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत खुलासा केला आहे. तिने यामध्ये माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे म्हटले आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्तीचा एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेद्वारे समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, पांढऱा ड्रेस परिधान केलेली रिया चक्रवर्ती माध्यमांसमोर आपला मुद्दा मांडत आहे. रिया म्हणाली, “माझा देव आणि न्यायप्रणालीवर दृढ विश्वास आहे.” माझा विश्वास आहे की मला न्याय मिळेल .
त्यानंतर व्हिडिओमध्ये रिया पुढे म्हणाली, ‘माध्यमांमधून माझ्याबद्दल बरेच काही सांगितले जात आहे, परंतु माझ्या वकीलांनी मला याबाबत भाष्य करण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. सत्य लवकरच सर्वाच्या समोर येईल. सत्यमेव जयते !
#WATCH: Rhea Chakraborty releases video on #SushantSinghRajputDeathCase.
She says, “I’ve immense faith in God & the judiciary. I believe that I’ll get justice…Satyameva Jayate. The truth shall prevail.” pic.twitter.com/Fq1pNM5uaP
— ANI (@ANI) July 31, 2020
रियाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत आणि काहीजण तिचे समर्थन करत आहेत तर काही जण त्यास ढोंगीपणा म्हणत आहेत.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी पटना येथील राजीवनगर पोलीस ठाण्यात रिया विरोधात तक्रार दाखल दाखल केली आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतची फसवणूक केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. सुशांतला फसवून त्याच्याकडून पैसे उकळले आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.