भांडवल असुलभतेमुळे प्रवासी वाहन विक्रीवर परिणाम

नवी दिल्ली – भांडवल असुलभता त्याचबरोबर वाहनांचे वाढत असलेले दर व निडणुकांमुळे निर्माण झालेली अनिश्‍चितता या कारणामुळे सरलेल्या वर्षात प्रवासी वाहन विक्रीत केवळ 2.7 टक्के वाढ होऊ शकली.

वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सिआम या संघटनेने सांगितले की, 2017-18 या वर्षात 32,88,581 एवढी वाहने विकली गेली होती. तर 2018-19 या वर्षात त्यात अल्प वाढ होऊन ते 33,77,436 वाहने विकली गेली आहेत. या कालावधीत कंपन्यांनी बरीच गुंतवणूक करून नवी उत्पादने सादर केली असली तरी वाहन विक्री वाढली नाही. सरलेल्या वर्षात वाहन विक्री सहा ते दहा टक्‍क्‍यांनी वाढेल असे सिआमने म्हटले होते.

मात्र तसे होऊ शकले नाही असे सिआमने या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ते म्हणाले की, सरलेल्या वर्षात वाहन उद्योगासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे बहुतांश कंपन्या दरवाढ करीत आहेत.
त्याचबरोबर आगामी काळातही नव्या उत्सर्जन नियमामुळे आणि इतर कारणांमुळे वाहनांच्या दरात वाढ करावी लागणार आहे, सरलेल्या वर्षात विम्याचा वाढीव खर्च आणि इतर कारणांमुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला.

त्याचबरोबर या क्षेत्रासमोर उपलब्ध असलेली भांडवल असुलभतेची अडचण आणखीही पूर्णपणे संपलेली नाही. आगामी वर्षातही वाहन विक्री फारतर तीन ते पाच टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता त्यांना वाटते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.