प्रो-कबड्डी लिग : सिद्धार्थ देसाईवर लागली 1 कोटी 45 लाखांची बोली

प्रो-कबड्डी लिग सातवा हंगाम लिलाव प्रक्रिया

मुंबई – प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामासाठी लिलाव पार पदला असून या लिलवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो कोल्हापूरचा सिद्धार्थ देसाई. गत हंगामात आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या सिद्धार्थला यंदाच्या हंगामात तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांची बोली लागली. त्याला तेलगू टायटन्सने आपल्या गोटात खेळण्यात यश मिळवले. गेल्यावेळी तो यु मुम्बाकडून खेळलेल्या सिद्धार्थला मुम्बाने रिटेन केले नाही.

पहिल्या दिवसाच्या लिलावादरम्यान सिद्धार्थची किंमत 30 लाख ठरवण्यात आली होती. मात्र तेलगू टायटन्सने सर्वांना मागे टाकत सिद्धार्थसाठी थेट 1 कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर तामिळ थलायवाज आणि तेलगू टायटन्स संघात संघर्ष पहायला मिळाला. मात्र तेलगू टायटन्सने 1 कोटी 45 लाखांच्या बोलीवर सिद्धार्थला आपल्या संघात कायम राखण्यात यश मिळवलं.

सिद्धार्थला आपल्या संघात घेणे हे ठरलेले नव्हते, मात्र बचावाची बाजू भक्‍कम झाल्यानंतर आम्ही सिद्धार्थला घेण्याचा प्लान केला आणि आम्ही त्यात यशस्वी झालो. तेलगू टायटन्सच्या संघमालकांनी लिलावानंतर याबाबतचे स्पष्टीकरण दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.