स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत बुलढाण्यातील एकनाथ तळेले हे राज्यातून व मागासवर्गीयातून प्रथम आले आहेत. महिला वर्गातून सांगलीतील सलोनी निकम या राज्यात प्रथम आल्या आहेत.

आयोगातर्फे जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गटाच्या “अ’ व “ब’ वर्गातील एकूण 199 पदांसाठी ही परीक्षा दि. 17 डिसेंबर 2017 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल दि. 30 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. उमेदवारांच्या माहितीसाठी निका व पदनिहाय प्रत्येक वर्गवारीसाठी शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुट अर्थात कटऑफ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

स्थापत्य अभियांत्रिकीची पूर्व परीक्षा 9 जुलै 2017 रोजी घेण्यात आली. यातून पूर्वपरीक्षेसाठी 31 हजार 518 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. यातून मुख्य परीक्षेसाठी 3 हजार 593 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानंतर मुख्य लेखी परीक्षेच्या निकालातून मुलाखतीसाठी 640 उमेदवार पात्र ठरले. मुलाखती दि. 25 फेब्रुवारी ते 28 मार्च 2019 या कालावधीत झाल्या. त्यातून 199 उमेदवारांची निवड करण्यात आली. यातील पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांनी नवीन संगणक प्रणालीच्या नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील, असेही आयोगाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.