वॉशिंग्टन – परदेशातील हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या चीनच्या नागरिकांच्या व्हिसावर आणखीन निर्बंध घालण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. हे निर्बंध चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर किंवा प्रचारात सहभागी सलेल्यांवर किंवा “युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट’शी संबंधित अभियानाला प्रोत्साहन देत असलेल्यांवर लागू होतील, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटले आहे.
चीनमधील मनवी हक्कांच्या पायमल्लीबाबत, उघ्युर भागातील तिबेट अथवा अन्यत्र कोठेही अत्याचारांबाबत आवाज उठवणाऱ्या लोकांवर युनायटेड फ्रंट दबाव आणण्याचे काम करत असते. अशा व्यक्तींचा, त्यांच्या कुटुंबीयांचा आणि अन्य तपशील इंटरनेटवर जाहीर केला जातो.
संबंधित व्यक्तींना धमकावण्याचाच हा प्रकार असल्याचे पॉम्पेओ यांनी नवीन निर्बंधांची माहिती देताना सांगितले. आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात कृत्यांना जबाबदार असलेल्यांना अमेरिकेत स्थान असू नये, यासाठीच हे निर्बंध लागू केले गेले आहेत, असे ते म्हणाले.
करोनाची सातह्, व्यापारी, तंत्रज्ञान विषयक धोरणे, तैवानमधील अत्याचार आणि मानवी हक्कविषयक वादग्रस्त मुद्दयांच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेने घातलेल्या या निर्बंधांमुळे अमेरिका-चीनदरम्यानचे वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. चीन कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या व्हिसासाठी नवीन कालमर्यादा निश्चित करण्याची घोषणाही अमेरिकेकडून अलिकडेच केली गेली आहे.