रेडा – विठाई बसनेने पंढरीकडे निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने इंदापुरात तासभर विसावा घेतला. रिंगणस्थळी रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हा सोहळा थांबला होता.
या बसचे इंदापूर नगरीत केवळ तुतारी वाजवत व हरिनामाचा गजर करत प्रशासकीय स्तरावर स्वागत करण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, यांनी पुष्पहार अर्पण करून पादुकांचे प्रतिनिधीक स्वरुपात स्वागत केले. दरम्यान, या विठाई बसचे इंदापूर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण करण्यात केले.