नगर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कापडबाजार परिसर बफर झोन म्हणून घोषीत केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर उपासामारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने कापडबाजार परिसर हा बफर झोन मधून वगळावा अशी मागणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत कापड बाजार व्यापारी असोसिएशन, सराफ बाजार असोसिएशन, मोची गल्ली व्यापारी, आडते बाजार असोसिएशन ने शिवसेना उपनेते राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, आनंद लहामगे, नगरसेवक दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, विक्रम राठोड, किरण होरा, देडगावकर, मनीष गुगळे, विजय चोपडा, राजेंद्र गांधी यांसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर शहरा मध्ये झेंडीगेट, माळीवाडा, नवीपेठ, सर्जेपुरा, नालेगाव, आडते बाजार, दाळमंडीई हा भाग कापड बाजार, सराफ बाजार, भांडे बाजार अत्यंत जवळ जवळ आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने हा परिसर बफर झोन म्हणून घोषीत केला आहे. असे प्रशासनानाच्या वतीने सांगण्यात आले.