पोलिसांना कोरोनाबाधित भागात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी 

 पुणे : शहरातील नागरिकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एकाबाजूला पोलिसांनी रस्त्यावर उतरून बारा तास  ड्युटी करत आहेत . तर दुसरीकडे  विविध भागातील झोपडपट्ट्यांमध्ये जात तेथील घरांना भेट देऊन माहिती गोळा करून घेत आहेत. यामुळे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी हैराण झाले आहे. पोलिसांना कायदा सुव्यवस्थे व्यतिरीक्त हे अतिरिक्त काम करावे लागत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून दररोज नवनवीन आदेश आणि सूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जात असल्याने पोलिस दलातील कर्मचारी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून पोलिस दलातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना करोना होऊ नये, यासाठी राज्य सरकार परिपत्रक काढून विविध उपाययोजना करण्यास सांगत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचा अधिक प्रभाव क्षेत्र असलेल्या झोपडपट्टीमध्ये जाऊन तेथील सर्वेक्षण करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबधित पोलिस स्टेशनमधील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर दिली आहे.
शहरातील ज्या मध्यवर्ती भागात करोनाचे अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तो भाग नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी यापूर्वीच सील केला असून तेथे संचारबंदी कडक करण्यात आलेली आहे.
या भागात असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन  पोलिसांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी एक नमुना तक्ता तयार करण्यात आला असून त्यानुसार माहिती गोळा करण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. 
खबरदारीचा उपाय म्हणून जो भाग सील करण्यात आलेला आहे. तेथे पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी काम करायचे आहे. हे काम झाले की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे. या भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दिवसातून तीन वेळा पाहणी करून तेथे औषध फवारणी केली जात आहे.  औषध फवारणी झाली नसल्यास ती करून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे.
पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी देखील करण्यात आलेली आहे. त्यातच आवश्यक ती खबरदारी न घेता वरिष्ठ अधिकारी पोलिस कर्मचारी यांना झोपडपट्टीमध्ये शौचालयांची स्वच्छता पाहण्यासाठी पाठवित आहेत. ज्या  कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, यामुळे पुढील काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न देखील पोलिस कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.